पिस्तुल्या… सावधान ! पिस्तूलबाजांना रोखण्यासाठी त्यांची कुंडली शोधण्याचे काम सुरू | पुढारी

पिस्तुल्या... सावधान ! पिस्तूलबाजांना रोखण्यासाठी त्यांची कुंडली शोधण्याचे काम सुरू

महेंद्र कांबळे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्टेटससाठी तसेच गुन्हे करण्यासाठी बेकायदा पिस्तूल बागळणार्‍यांची संख्या शहरात वाढत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने अशा पिस्तूलबाजांना रोखण्यासाठी त्यांची कुंडली शोधण्याचे काम सुरू केले आहे. त्याच धर्तीवर आता 2015 नंतर बेकायदा पिस्तूल बाळगल्याने गुन्हे दाखल झालेल्यांकडे व अटक झालेल्यांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याआधारे गुन्हे शाखेकडून मुख्य सूत्रधार आणि परराज्यातील कनेक्शनपर्यंत पोहचण्यासाठी तयारी सुरू आहे. पुणे पोलिसांनी मागील दोन वर्षांत 201 पिस्तुले जप्त करताना 748 काडतुसे जप्त केली आहेत.

 

2015 नंतर ज्यांच्यावर बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. अशांची पुन्हा चौकशी सुरू आहे. पूर्वीच्या या संशयितांचा पुन्हा पिस्तूल तस्करीशी संबंध आला का, कुठले आरोपी यामध्ये अद्यापही अ‍ॅक्टीव्ह आहेत, याचा शोध घेऊन डीलरसह मुख्य आरोपी व परराज्यातील कनेक्शन शोधण्याची तयारी सुरू आहे.
                                                  – अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.

बेकायदा शस्त्र तस्करीचे मध्य प्रदेश कनेक्शन
पुण्यात बेकायदा शस्त्रांचा सुळसुळाट सुरू असून, या ठिकाणी येणारी बहुतांश बेकायदा पिस्तुले ही मध्य प्रदेशातून आणली जात असल्याचे आजपर्यंत झालेल्या कारवायावरून समोर आले. अनेकदा मध्य प्रदेश कनेक्शन उघड झाले आहे. मात्र, पाळेमुळे खणण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 17 पिस्तुले, तर 13 जिवंत काडतुसे नुकतीच जप्त करण्यात आली होती. या पिस्तुलांची तस्करी करणा-या डिलरसह सहा जणांना अटक
केली होती.

गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत 17 पिस्तुले तर 13 जिवंत काडतुसे नुकतीच जप्त केली होती.
पिस्तुलांची तस्करी करणा-या डिलरसह सहा जणांना अटक केली होती.

Back to top button