तळेगावातील थकबाकीदार 5 मोबाईल टॉवरला सील | पुढारी

तळेगावातील थकबाकीदार 5 मोबाईल टॉवरला सील

तळेगाव दाभाडे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता वसुली पथकाद्वारे येथील 5 मोबाईल टॉवरला मोठे थकबाकीदार म्हणून सील करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. यामध्ये करनिरीक्षक विजय शहाणे,मयूर मिसाळ, सुवर्णा काळे, प्रवीण शिंदे, आशिष दर्शिले यांनी सहभाग घेतला होता.

सध्या नगर परिषदेकडून अनेक वसुली पथकांची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये जयंत मदने, सिध्देश्वर महाजन, प्रमोद फुले रोहित भोसले, रवींद्र काळोखे, मनीषा चव्हाण, प्रवीण माने, आदेश गरुड, तुकाराम मोरमारे, वैशाली आडकर, विलास वांघमारे, उषा बेल्हेकर आदींचा समावेश आहे.

तसेच तळेगावातील मालमत्ता धारकांनी त्वरित कारवाई होण्याअगोदर मालमत्ता कर भरावा. या आगोदर ज्या मालमत्ता सील केल्या आहेत त्याचा नियमाप्रमाणे लिलाव करून वसुली करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

44 लाखांची थकबाकी
तळेगावमधील एकूण 10 मोबाईल टॉवरकडून सुमारे 44 लाख 37 हजार 932 रुपये येणे बाकी आहे. यामधील जिजामाता चौक, राव कॉलनी, मावळ लँड, सँमसननगर व तपोधाम कॉलनी या 5 मोबाईल टॉवरवर नगर परिषदेने थकबाकी वसुलीसाठी मोबाईल टॉवर लॉकची कारवाई केली असल्याची माहिती करनिरीक्षक विजय शहाणे यांनी दिली.

Back to top button