आंबेगाव-शिरूर तालुक्यातील रस्त्यांसाठी वीस कोटी मंजूर | पुढारी

आंबेगाव-शिरूर तालुक्यातील रस्त्यांसाठी वीस कोटी मंजूर

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा 2 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यानुसार वैदवाडी ते ढाकाळे रस्ता (लांबी 5 किमी) – 3 कोटी 63 लाख रुपये, भावडी कुरवंडी ते कोळवाडी रस्ता (लांबी 2 किमी) – 1 कोटी 20 लाख रुपये डिंभे ते कोलतावडे-बेंढारवाडी रस्ता (लांबी 3.5 किमी) – 2 कोटी 48 लाख रुपये, पाबळ ते गणेशनगर रस्ता (लांबी 1.3 किमी) – 1 कोटी 14 लाख रुपये, कवठे ते धुमाळवाडी-पोकळदरा-वडगावपीर रस्ता (लांबी 4 किमी) – 3 कोटी 95 लाख रुपये, कवठे ते गणेशी-लाखणगाव रस्ता (लांबी 6 किमी) – 4 कोटी 82 लाख रुपये, मलठण ते शिंगाडेवाडी रस्ता (लांबी 2.1 किमी) – 2 कोटी 7 लाख रुपये असा निधी मंजूर झाला.

Back to top button