पिंपरी : काकडी, टोमॅटो, लिंबू, लसूणचे दर वाढले | पुढारी

पिंपरी : काकडी, टोमॅटो, लिंबू, लसूणचे दर वाढले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने काकडी, टोमॅटो, लिंबू आणि लसणाची आवक घटली आहे. परिणामी यांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र रविवारी बाजारात दिसून आले. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी भाजी मंडईमध्ये टोमॅटोची 40 क्विंटल, लिंबूची 28 क्विंटल, लसूणची 1 क्विंटलने आवक गेल्या आठवड्यापेक्षा घटली आहे.

उन्हामुळे टोमॅटो आणि काकडीच्या पिकांना फटका बसला आहे. उन्हामुळे पिकांची वाढ होत नसल्याने पीक येण्यास उशीर होत आहे. परिणामी आवक घटली असून बाजारात दर वाढले आहेत. काकडी 171, टामॅटो 433, लसूण 4, लिंबू 28 एवढी क्विंटल आवक झाली.
घाऊक बाजारात काकडी 6 ते 10 रूपये, टोमॅटो 10 ते 12, लसूण 19 ते 20रूपये, लिंबू 40 ते 45 रूपये, दराने विक्री झाली. तर किरकोळ बाजारात काकडी 40 ते 50, टोमॅटो 25 ते 30, लिंबू 100 ते 110 व लसूण 80 ते 100 रूपये प्रतिकिलो दराने विक्री झाल्याची माहिती पिंपरी येथील विक्रेते सुनील गायकवाड यांनी दिली.

या आठवड्यातही किरकोळ बाजारात मेथी, पालक, कोथंबिरीची प्रति जुडी दहा रूपये दराने विक्रीसाठी उपलब्ध होती. मोशी उपबाजारात भेंडीची आवक 90 क्विंटल, शेवगा 23 क्विंटल, वटाण्याची 229 क्विंटल, कांदा 407 क्विंटल, बटाटा 486 क्विंटल, आले 42 क्विंटल आवक झाली. पालेभाज्यांच्या एकूण गड्डी 47200, फळे 667 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2942 क्विंटल एवढी आवक झाली.

फळभाज्यांचे किलोचे भाव

कांदा 25
बटाटा 30
लसूण 80 ते 100
आले 60
गावरान गवार 140
टोमॅटो 25 ते 30
दोडका 40
हिरवी मिरची 60
दुधी भोपळा 40
लाल भोपळा 40
कारली 50-60
वांगी 60-70
भरीताची वांगी 70
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 40
कोबी 20 ते 25
गाजर (महाबळेश्वर) 50-60
गाजर (दिल्ली) 30
ढोबळी मिरची 50
बिन्स 50
बीट 30
आवळा 50
राजमा 30
गवार 100- 110

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
कोथिंबीर 15
कांदापात 15
शेपू 10
पुदिना 05
मुळा 15
चुका 15
पालक 10
मेथी 12 ते 15

 

Back to top button