कामशेत परिसरात बटाट्याचे पीक जोमात | पुढारी

कामशेत परिसरात बटाट्याचे पीक जोमात

कामशेत : कामशेत परिसरात बटाट्याचे पीक जोमात आले आहे. सध्या चांगले हवामान असल्यामुळे घसघशीत उत्पन्न मिळण्याची आशा बळीराजाला आहे. पावसाळा संपल्यानंतर नाणे मावळातील शेतकरी रब्बी पिके घेत असतात. त्यातील बटाटा हे मुख्य पीक घेतले जाते. मार्केटमध्ये बटाट्याला चांगली मागणी असून, त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत असतो. हे शेतकर्‍यांच्या आता लक्षात आले असल्यामुळे बाराही महिने बाजारात बटाटा मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. याचा फायदा शेतकर्र्‍यांना हेात आहे.

कांब्रे ना.मा. येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर मारुती गायकवाड यांनी आपल्या 19 गुंठे जागेमध्ये बटाट्याचे पीक घेतले आहे. बटाट्याचा वापर हा भाजीसाठी केला जातो. खेडेगावात उपवासाठी महिला वेफर्स, बटाट्याच्या पापड्या मोठ्या प्रमाणात करतात.
गायकवाड यांनी सुरुवातीला टॅक्टर व बैलच्या साह्याने रोटरद्वारे मशागत करून जमीन भुसभुशीत केली.

त्यानंतर 19 गुंठे जागेमध्ये वाफे पाडले असून, त्यामध्ये बटाटा लागवड केली आहे. परिसरात कोणत्याच प्रकारचे रासायनिक खते न वापरता जनावरांचे मूत्र व शेणखत टाकून सेंद्रिय पद्धतीने बटाट्याची लागवड केली आहे. थंड हवामान बटाटा पिकासाठी पोषक असते. सध्या हवामानात होत असलेले बदल बटाटा पिकासाठी अनुकूल आहेत. शिवाय सध्या हिवाळा सुरू असून, त्यामध्ये बटाटा हे पीक जोरात आले आहे.

Back to top button