खोर : अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा फटका | पुढारी

खोर : अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा फटका

खोर; पुढारी वृत्तसेवा : सध्या असलेल्या ढगाळ हवामानाचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. दौंड तालुक्यातील खोर गावात अंजिराचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. जवळपास 60 हेक्टर इतके क्षेत्र हे अंजीर बागेचे खोरच्या परिसरात घेतले गेले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या ढगाळ, रोगट हवामानाचा मोठा फटका या अंजीरच्या फळाला बसत आहे.
ढगाळ हवामानामुळे अंजीर फळे हे उकलत असून गोडी देखील कमी होत आहे.

अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन निघत आहे. परिणामी अंजीर उकलले गेल्याने बाजारभावात देखील कमालीची घसरण झाली आहे. सद्या 30 ते 35 रुपये प्रती किलो दराने अंजीर व्यापारी वर्गाच्या माध्यमातून जात आहे. ढगाळ हवामानाचा फटका हा अंजीराच्या पानावर देखील बसला जात असून करपा जातीचा रोग या पानावर पडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान या रोगट ढगाळ हवामानामुळे होत आहे.

हवेमध्ये अद्रता वाढल्याने अंजीर तडकले जात आहे आणी पाऊस होऊन गेल्यावर थंड हवा सुटली की पानगळ होऊन करपा जातीचा रोग पडत आहे. एकंदरीतच या भागातील शेतकरी वर्गाची अंजीर पिकाचा पिक विम्यात समावेश करण्याची मागणी येथील शेतकरी वर्गाने केली आहे.

 

 

Back to top button