पिंपरी : अडीच मिनिटांच्या क्लिपसाठी अडीच लाखांचा खर्च | पुढारी

पिंपरी : अडीच मिनिटांच्या क्लिपसाठी अडीच लाखांचा खर्च

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. जनजागृती करण्यासाठी पालिकेच्या वतीने 2 मिनिट 24 सेकंदाची व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली. या क्लिपसाठी तब्बल अडीच लाखांचा खर्च झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणसाठी शहरातील झोपडपट्ट्यांना रंगरंगोटी करण्यात आली. तसेच शहरातील कचरा विघटन, कचरा वर्गीकरण आदी उपक्रमांचा समावेश होता.

या सर्व उपक्रमांची एकत्रित चित्रफित तयार करून ती प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्यासाठी स्वरा पब्लिसिटी यांनी 2 मिनिट 24 सेकंदांची व्हिडिओ क्लिप तयार करून दिली. त्याचा खर्च 2 लाख 50 हजार इतका झाला आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.

Back to top button