बारामती: सांगवीत सुपारीवर श्रीगणेशाची कलाकुसर | पुढारी

बारामती: सांगवीत सुपारीवर श्रीगणेशाची कलाकुसर

सांगवी, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील सांगवी येथील पुजा प्रशांत तावरे या गृहिणीने चक्क सुपारीवर श्रीगणेशाची कलाकुसर केली आहे. उच्चशिक्षित पुजा तावरे यांना सुक्ष्म वस्तूंवर कलाकुसर करण्याचा छंद आहे. त्यांनी सुपारीवर देवदेवतांच्या कलाकुसर केलेल्या असून, शिवकालीन राजमुद्रेची हुबेहूब प्रतिकृती निर्माण केल्या आहेत. सध्या दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत असल्याने त्यांनी सुपारीवर श्रीगणेशाची केलेली कलाकुसर इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरण्यास वाव मिळणार आहे.

Back to top button