पिंपरी : बनावट शिक्क्यांच्या आधारे कंपनीची फसवणूक | पुढारी

पिंपरी : बनावट शिक्क्यांच्या आधारे कंपनीची फसवणूक

पिंपरी : बनावट शिक्क्यांच्या आधारे फायनान्स कंपनीचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून फायनान्स कंपनी आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) फसवणूक केली. याप्रकरणी पती, पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 22 ते 24 सप्टेंबर 2021 या कालावधीत घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर डोंबे (41, रा. हडपसर) यांनी सोमवारी (दि. 22) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनिल मोरे (रा. भोसरी) आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी महिलेच्या नावावर असलेल्या गाडीवर एचडीबी फायनान्स कंपनीच्या कर्जाचा बोजा आहे. दरम्यान, आरोपींनी गाडीवरील कर्जाचा बोजा उतरविण्याच्या हेतूने फायनान्स कंपनीचा बनावट शिक्का मारून बनावट ना हरकत प्रमाणपत्र आरटीओत सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात हा प्रकार निदर्शनास आला.

Back to top button