तळेगाव स्टेशन तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू | पुढारी

तळेगाव स्टेशन तळ्यात बुडून युवकाचा मृत्यू

तळेगाव; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील तळ्यामध्ये गुरूवारी (दि.२३) अनिकेत घनश्याम तिवारी(वय१८) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. अनिकेत तिवारी डी वाय पाटील कॉलेज (आंबी ता.मावळ) येथे शिक्षण घेत होता. मंत्रासीटी तळेगाव दाभाडे येथे राहत होता. तो मुळचा अभनपुरचा (छत्तीसगड) आहे.

अनिकेत तळ्यावर पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. पोहताना पाण्याचा अंदाजन आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना ५ च्या सुमारास उघडकीस आली यानंतर अनिकेतचे शोधकार्य सुरु केले. सायंकाळी सुमारे ७.३०वा.पर्यंत शोधकार्य चालु होते. अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. परत, शुक्रवारी(दि.२४) सकाळी ६.३०वा.सुमारास शोधकार्य सुरु केले असता सकाळी ७.४५ च्या सुमारास अनिकेतचा मृतदेह मिळाला.

या शोधकार्यात निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, गणेश गायकवाड, गणेश सोंडेकर, गणेश ढोरे, अविनाश कार्ले, कुंदन भोसले, ताहीर मोमीन, श्रीसंत भेगडे, कुणाल दाभाडे, शुभम काकडे, शेखर खोमणे, धीरज शिंदे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन दल, पोलीस यांनी सहभाग घेतला.

Back to top button