Nashik News | ऐन उन्हाळ्यात इंदिरानगरभागातील वडाळागावसह निम्मा भाग अंधारात, नागरिक संतप्त | पुढारी

Nashik News | ऐन उन्हाळ्यात इंदिरानगरभागातील वडाळागावसह निम्मा भाग अंधारात, नागरिक संतप्त

इंदिरानगर पुढारी प्रतिनिधी- नाशिक शहरातील उन्हाचे तापमान 42° सेल्सियसच्या वरती गेल्याने नाशिककर उकाड्याने हैराण झाले आहे. असे असताना इंदिरानगर भागातील वडाळा गाव सह भारत नगर, खोडे नगर, इंदिरानगरचा निम्मा भाग अंधारात होता. तब्बल 26 तासानंतर गुरुवारी दुपारी एक ते सव्वा वाजेच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. मागील आठवड्यात सतत या भागात 18 ते 19 तास विजेची बत्ती गुल होती. त्यामुळे  सब स्टेशन मधील विज कर्मचारी यांना नाहक नागरिकांच्या रोषांला सामोरे जावे लागले. या संतप्त जमावाने दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती.

अशोका मार्ग, खोडे नगर, विधाते नगर, वडाळा गाव हा संपूर्ण भाग बुधवारी रात्रीपासून अंधारात होता. या भागातील नागरिकांना अक्षरशः रात्र घराबाहेरच जागून काढावी लागली तसेच राजसारथी, कलानगर , श्रद्धा विहार या भागात सुद्धा दर पाच ते दहा मिनिटाला लाईटचा येण्या जाण्याचा खेळ सुरूच असल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रारी केल्या. याची दखल घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक रोड येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या कार्यालयात स्थानिक नागरिकांचं लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळाने भेट घेत इंदिरानगर परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्नावर जाब विचारला. यावेळेस अधीक्षक अभियंता यांनी लवकरच या प्रश्न ताबडतोब कायमस्वरूपाची उपाययोजना करू असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे अजिंक्य साने, श्याम बडोदे, यशवंत निकुळे आदींसह इंदिरानगर भागातील नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा –

Back to top button