पुणे : काश्मीरमधील सदस्यांची जिल्हा परिषदेला भेट | पुढारी

पुणे : काश्मीरमधील सदस्यांची जिल्हा परिषदेला भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: काश्मीर विभागातील 12 जिल्ह्यांतील 16 जिल्हा परिषद (जिल्हा विकास परिषद) सदस्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. या वेळी पुणे जिल्हा परिषदेतील विकास प्रक्रिया आणि योजना त्यांनी समजून घेतल्या. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा परिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्हा विकास परिषद सदस्य आहेत. हे सदस्य जिल्हा परिषदेतील कामकाजाची माहिती घेत आहेत.

पंचायती राज संस्थांमधील निवडून आलेले सदस्य आणि अधिकारी यांच्यातील भूमिका आणि जबाबदार्‍यांची विभागणी समजून घेत आहेत. कामकाजात येणार्‍या समस्या समजून घेण्यासाठी आणि जिल्हा परिषदेत मांडण्यासाठी कामकाज समजून घेत आहेत. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी कामकाजाची माहिती दिली.

Back to top button