Health Issues ICMR Guideline : भारतीयांमध्ये ५६ टक्के आजार हे ‘अनहेल्दी’ आहारामुळे, ICMR च्या अभ्यासातून खुलासा, मार्गदर्शक तत्त्वे जारी | पुढारी

Health Issues ICMR Guideline : भारतीयांमध्ये ५६ टक्के आजार हे 'अनहेल्दी' आहारामुळे, ICMR च्या अभ्यासातून खुलासा, मार्गदर्शक तत्त्वे जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लोकांना असलेल्या आजारांपैकी निम्म्याहून अधिक आजार हे आपल्या चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे (अनहेल्दी डाइट) होतात. देशातील ५६.४ टक्के आजारांचे कारण अस्वास्थ्यकारक आहार आहे, या संदर्भातील मोठा खुलासा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (ICMR) एका अभ्यासातून केला आहे. तसेच त्यांनी भारतीय लोकांच्या आहाराबाबत मार्गदर्शक तत्त्वेदेखील जारी केली आहेत. (Health Issues ICMR Guideline)

आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननुसार,(Health Issues ICMR Guideline) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात पोषणाची कमतरता, अशक्तपणा, लठ्ठपणा, मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचे वाढलेले सेवन, कमी योगासने आणि शारीरिक हालचाली आणि वजनाच्या समस्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे, असेदेखील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने म्हटले आहे.

यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनने भारतीय लोकांना मिठाचे सेवन मर्यादित करणे, तेल आणि चरबीयुक्त पदार्थांचा कमी वापर, योग्य व्यायाम करणे, तसेच साखर आणि अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी करण्याची विनंती भारतातील लोकांना केली आहे. अशा निरोगी जीवनशैलीचे पालन केल्यास मृत्यू टाळता येऊ शकतात, असेही या (Health Issues ICMR Guideline) अहवालात म्हटले आहे.

मुलांवर अनहेल्दी आहाराचा परिणाम

भारतातील बालकांमध्ये पोषणाच्या कमतरतेचा त्रास जाणवत आहे. यासोबतच जास्त वजन, लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या लक्षणांचा धोका वाढल्यामुळे अनेक राज्यातील बालकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्यदायी खाद्यपदार्थांपेक्षा अस्वास्थ्यकारक (अनहेल्दी), चरबीयुक्त, साखर आणि मीठयुक्त खाद्यपदार्थ आता बाजारात सहज उपलब्ध होत असल्याचेही अहवालात समोर आले आहे. अनहेल्दी खाद्यपदार्थांच्या जोरदार जाहिराती आणि विपणनामुळे, हे खाद्यपदार्थ अधिक लोकप्रिय झाले आहेत आणि येथूनच ते रोगांना कारणीभूत ठरत आहेत, असे देखील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या संयुक्त केलेल्या अहवालात म्हटले आहे.

आहार कसा असावा?

एका व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी दररोज 1,200 ग्रॅम अन्न आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे त्याला सुमारे 2,000 कॅलरीज मिळतात. एका प्लेटमध्ये 100 ग्रॅम फळे, 400 ग्रॅम हिरव्या भाज्या, 300 मिली दूध किंवा दही, 85 ग्रॅम डाळी किंवा अंडी, 35 ग्रॅम काजू आणि बिया आणि 250 ग्रॅम धान्ये असावीत. एका दिवसात 27 ग्रॅमपेक्षा जास्त फास्टफूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. तुम्ही वारंवार मांसाहार करत असाल तर दिवसाला जास्तीत जास्त 70 ग्रॅम चिकन किंवा मांस पुरेसे आहे, असेदेखील ICMR-National Institute of Nutrition च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button