Gold and Silver Price Today | ‘अक्षय तृतीया’ला सोनं खरेदी करताय! जाणून घ्या प्रति तोळा दर | पुढारी

Gold and Silver Price Today | 'अक्षय तृतीया'ला सोनं खरेदी करताय! जाणून घ्या प्रति तोळा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी (Akshay Tritiya 2024) एक शुभमुहूर्त समजला जातो. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे सराफा बाजारात या दिवशी मोठी उलाढाल होते. उद्या शुक्रवारी १० मे रोजी अक्षय तृतीया आहे. पण अक्षय तृतीयाच्या एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी (दि.९) शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) किरकोळ कमी होऊन प्रति १० ग्रॅम ७१,६२४ रुपयांवर खुला झाला. बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ७१,६४५ रुपयांवर बंद झाला होता. दरम्यान, चांदीच्या दरात प्रति किलोमागे ७५४ रुपयांची वाढ झाली आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.९) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७१,६२४ रुपये, २२ कॅरेट ६५,६०८ रुपये, १८ कॅरेट ५३,७१८ रुपये, १४ कॅरेटचा दर ४१,९०० रुपयांवर खुला झाला. तर आज गुरुवारी चांदीचा दर प्रति किलो ८२,२९६ रुपयांवर खुला झाला आहे. बुधवारी चांदीचा दर प्रति किलो ८१,५४२ रुपयांवर बंद झाला होता.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट हे शुद्ध सोने मानले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर होतो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold Price Today)

 हे ही वाचा :

 

Back to top button