पिंपरी : रावेतमधील मंदिराची दानपेटी चोरीला | पुढारी

पिंपरी : रावेतमधील मंदिराची दानपेटी चोरीला

पिंपरी : रावेतमधील सिद्धिविनायक गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. दानपेटीत अंदाजे 50 ते 60 हजार रुपये होते. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री 11.30 ते मंगळवारी (दि.16) पहाटे 4.30 च्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे पुजारी धर्मराज मारुती शिंदे (वय 59, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रावेत गावठाणमधील सिद्धीविनायक गणेश मंदिराचा बंद दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिरात ठेवलेली दानपेटी चोरट्यांनी चोरून नेली. दानपेटीत अंदाजे 50 ते 60 हजार रुपये होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मंदिरात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर ठाकले आहे.

Back to top button