पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णसंख्या आठवडाभरात निम्म्याने घटली | पुढारी

पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णसंख्या आठवडाभरात निम्म्याने घटली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात दररोज कोरोनाबाधित होणार्‍या रुग्णांची संख्या मंगळवारी तीसच्या आत आली. दिवसभरात 29 बाधित रुग्ण आढळले. गेल्या आठवडाभरात ही रुग्णसंख्या निम्म्याने कमी झाली आहे. शहरात दररोज बाधित होणार्‍या रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे जाऊन पोहचली होती. मात्र, गेल्या आठवडाभरापासून बाधितांची संख्या आटोक्यात आली आहे.

आठवडाभरापूर्वी म्हणजेच 10 तारखेला 61 बाधित रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेत मंगळवारी (दि.16) दिवसभरात केवळ 29 रुग्ण आढळले आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये हळूहळू रुग्णसंख्या कमी होत गेली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 29 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 382 सक्रिय रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे. आज दिवसभरात 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 356 रुग्णांवर चाचणी करण्यात आली.

Back to top button