पुणे : दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू | पुढारी

पुणे : दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा : आळेफाटा येथून नारायणगावच्या दिशेला मोपेड गाडीवरून जात असताना १४ नंबर या ठिकाणी अपघात होऊन एका २८ वर्ष वयाच्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

नागपूर हादरले! ११ वर्षीय मुलीवर ९ जणांचा सामूहिक बलात्कार, पैशांचे आमिष दाखवून केलं कृत्य

विश्ववर्धन शिवाजी शिंदे (वय २८, रा. विकासनगर कॉलेज रोड, वडगाव बुद्रुक, पुणे) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून, याबाबतची फिर्याद मनोहर महादेव बोधे (वय ६८, बी वन ४०१, शिवसागर सिटी फेज वन, सन सिटी रोड, आनंद नगर, पुणे) यांनी दिली आहे.

शिक्षक भरती घोटाळा : पार्थ चटर्जींची मंत्रीपदावरुन हकालपट्टी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील मयत विश्ववर्धन हे आळेफाटा येथून त्यांच्या अॅक्टिवा गाडीने (एमएच १२ टीई ९८६४) नारायणगावच्या दिशेने येत असताना १४ नंबर नजीक त्यांचा अपघात झाला. अपघाताची माहिती समजतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी उपचाराकरिता विश्ववर्धन यांना नारायणगाव येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. हा अपघात नक्की कशामुळे झाला, याबाबतचा तपास नारायणगाव पोलिस करीत आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास पोलिस हवालदार मोहरे करीत आहेत.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती; धनंजय मुंडे समर्थक सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Back to top button