पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून चंद्रकांत पाटील यांची भेट | पुढारी

पुण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे 24 जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. आज पुण्यातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांकडून आमदार पाटील यांचे सांत्वन करण्यात आले.
दशक्रिया विधी आटोपून चंद्रकांत पाटील बुधवारी सायंकाळी पुण्यातील कोथरूड येथील निवासस्थानी आले. या वेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील राजकीय मंडळी, अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची सांत्वन भेट घेतली.

यामध्ये प्रामुख्याने आमदार नीतेश राणे, आमदार राम शिंदे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू भगिरथ काळे, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे, सिने अभिनेते गुलशन ग्रोवर आणि अभिनेता सलमान खान यांचे अंगरक्षक शेरा, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, अप्पर पोलीस प्रशासनचे जालिंदर सुपेकर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, सहपोलिस आयुक्त संजय शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र मनोज लोहिया, निवृत्त पोलीस सह आयुक्त प्रतिभा जोशी, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, उपायुक्त राजेंद्र मुठे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, माजी आमदार शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे, सिनेअभिनेते आरोह वेलणकर, माजी एटीएस प्रमुख भानुप्रताप बर्गे यांच्यासह भाजप व विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व नियोजनाचे काम पाहिले.

Back to top button