पिंपरी : दुसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : दुसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हॉटेल व्यवस्थापनाने दोघांना बेदम मारहाण केली. दरम्यान, एका तरुणाने हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री भुजबळ चौक, वाकड येथील बार हिस्ट या हॉटेलमध्ये घडली.

अभय गोंडाणे (21, रा. विश्रांतवाडी), असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मनोजकुमार गोईलकर (24, रा. विश्रांतवाडी, पुणे. मूळ रा. सांगली) यांनी वाकड ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बार हिस्ट हॉटेलचे मालक, मालकीण, बाउन्सर, बार टेंडर, डीजे, मॅनेजर गजानन खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र अभय गोंडाणे एकत्र राहतात. रविवारी (दि. 24) रात्री ते भुजबळ चौक वाकड येथील बार हिस्ट हॉटेलमध्ये दीडच्या सुमारास पार्टीसाठी गेले. यावेळी एका तृतीयपंथीसोबत वाद झाला. त्यामुळे हॉटेल मालकांनी फिर्यादीस हुसकावले. याबाबत अभयने याचा जाब विचारला. असता त्यांना मारहाण केली. त्यावेळी अभय याने दुसर्‍या मजल्यावरून उडी मारली. त्यात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Back to top button