मुंढवा : कस्तुरबा विद्यालयात कोरोनातील गाद्या पडून; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

मुंढवा : कस्तुरबा विद्यालयात कोरोनातील गाद्या पडून; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोडवरील मनपाच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात कोरोनाकाळात ज्या रुग्णांना क्वारंटाईन केले होते, त्या रुग्णांसाठी वापरलेल्या गाद्या शाळेच्या जिन्याखाली अद्यापही पडून आहेत. त्यामुळे महापालिकेला मुलांच्या आरोग्याची काहीच काळजी का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत कोरोना रुग्णांना कस्तुरबा गांधी विद्यालयात क्वारंटाईन केले होते. मनपाने त्यांच्यासाठी येथे बेड व गाद्यांची व्यवस्था केली होती.

नंतर त्या गाद्यांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक होते. पण, या गाद्या शाळेच्या जिन्याखाली अद्यापही पडून आहेत. त्यामुळे पालकांनी पालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मनपाच्या निष्काळजीपणामुळे मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या गाद्यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. तसेच याला जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील तुषार जाधव यांनी केली आहे.

बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय होण्यासोबतच विद्यापीठातील प्रदूषण कमी व्हावे व तेथील अनावश्यक वाहतूक कमी व्हावी, यासाठी ही बससेवा सुरू केली आहे. या बससेवेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवश्यकता भासल्यास आणखीही बस विद्यापीठात सुरू केल्या जातील.

– राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button