पुणे : तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; दोघा भावांना अटक | पुढारी

पुणे : तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; दोघा भावांना अटक

पुणे पुढारी वृत्तसेवा: दोघा भावांनी एका तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. कोंढवा, मिठानगर परिसरात नुकताच हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी शोहेब अन्सारी (वय 35) व अन्वर अन्सारी (वय 40) या दोघांना अटक केली. फिर्यादी तरुण रात्री कामावरून घरी जात होता.

तो मिठानगर परिसरात आल्यानंतर शोहेब याने दुचाकीवरून येऊन त्याला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला दुचाकीवरून त्याच्या घरी नेले. त्याठिकाणी शोहेब याने मोठ्या भावालाही बोलावून घेतले. त्यानंतर तरुणासोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्याचे चित्रीकरण अन्वर याने त्याच्या मोबाईलमध्ये केले. त्यानंतर त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Back to top button