पुणे : भीमाशंकर, आहुपे परिसरात मुसळधार | पुढारी

पुणे : भीमाशंकर, आहुपे परिसरात मुसळधार

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : भीमाशंकर व आहुपे परिसरात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले तुंडुब भरून वाहात आहेत. तर भात खाचरांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. वादळी वार्‍यासह जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे.
सह्याद्रीच्या डोंगर- रांगेत सध्या चार दिवस मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यात भीमाशंकर, आहुपे, पाटण व आसाणे खोर्‍यात धो-धो पाऊस कोसळत आहे. घोड व बुब्रा नदी दुथडी वाहत आहेत.

वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून विद्युत तार तुटल्या आहेत. पंचाळे खुर्द येथे विजेचे खांब पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची छप्परे उडाली आहेत. यात कुशिरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाच्या छताचे 3 पत्रे उडून गेले आहेत.

Back to top button