पवनानगर : पावसामुळे शेतीचे नुकसान | पुढारी

पवनानगर : पावसामुळे शेतीचे नुकसान

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : पवन मावळ परिसरात गेल्या कांही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात पवन मावळ परिसरात सुमारे 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शेतीचे बांध फुटले असून, भाताची रोपे वाहून गेली आहेत.

तर भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणत असल्यामुळे अनेक ठिकाणचे भातपीक खराब होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून वर्तवली जात आहे.
बुधवार (दि.13) दिवसभर पाऊस व जोराचे वारे असल्यामुळे पवनमावळ परिसरात अनेक ठिकणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. ़काही ठिकाणी विजेच्या खांबांवर झाडे पडल्यामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.

त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पावसाचा जोर कायम असून पवनेच्या पाणीसाठ्यात जलदगतीने वाढ होत आहे.
तर आपटी- गेव्हेंड येथे रस्त्यावर दरड कोसळ्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Back to top button