पुणे : लोणी काळभोर येथून 20 किलो गांजा जप्त | पुढारी

पुणे : लोणी काळभोर येथून 20 किलो गांजा जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 20 किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा चार लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

MP Sanjay Raut : फडणवीसांनी डबक्यात उतरू नये; संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यांना सल्ला

कुमार नितळे (वय 30, गायकवाडनगर, लोणी रेल्वे स्थानक परिसर), हृषीकेश रमेश बेले (वय 24, रा. इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांकडे गांजा असल्याची माहिती गस्त पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून 20 किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिनाभरात गुन्हे शाखेनी केलेली ही तिसरी कारवाई आहे.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मारुती पारधी, पांडुरंग पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आदेश बांदेकर-शरद पोंक्षे यांच्यात सोशल मीडिया वॉर, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

6 जूनला केला होता आठ लाखांचा गांजा जप्त

6 जून रोजी शहर आयुक्तालयाच्या हद्दीतील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उरुळी येथे तसेच
शिव मल्हार मोटर्स समोर अशा दोन वेगेवेगळ्या ठिकाणी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका महिलेसह चार जणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ने बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्याकडून यावेळी साडे आठ लाखांचा तब्बल 43 किलो गांजा गाड्यांसह जप्त करण्यात आला होता.

Back to top button