MP Sanjay Raut : फडणवीसांनी डबक्यात उतरू नये; संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यांना सल्ला | पुढारी

MP Sanjay Raut : फडणवीसांनी डबक्यात उतरू नये; संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यांना सल्ला

पुढारी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण हे डबक झाले आहे. या डबक्यात फक्त बेडूकच उड्या मारतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे फडणवीसांनी या डबक्यात उतरू नये, असे केल्यास फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल, असा सल्ला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांना दिला आहे.

ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निर्णयाने ११ जुलैपर्यंत या बंडखोरांना आराम मिळाला आहे. यानंतर बंडखोरांना महाराष्ट्रात यावंच लागेल. त्यामुळे सध्यातरी या बंडखोरांचे महाराष्ट्रात काहीच काम नसल्याचे राऊत म्हणाले. ठाकरेंनी काय करावे, हे गुवाहाटीत बसून आम्हाला सांगू नये. आसाममधील काहीजण आमच्यासाठी बंडखोर नाहीत त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये यावे. पक्षप्रमुखांसमोर आपली मते मांडावी आणि प्रश्न सोडवावेत अशीही टीका राऊत यांनी बंडखोरांवर केला आहे.

शिंदे अजूनही आमचे सहकारी असून, त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक कटुता नाही. त्यांनी परत यावे असे राऊत यांनी सांगितले. पक्षाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीसाठी जाणार नाही, ईडीला वाटत असेल तर मला त्यांनी अटक करावी असे मत खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button