अंदाज मुसळधारेचा; प्रत्यक्ष पुणे कोरडेच, शहरात पंचवीस वर्षांतील नीचांक | पुढारी

अंदाज मुसळधारेचा; प्रत्यक्ष पुणे कोरडेच, शहरात पंचवीस वर्षांतील नीचांक

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे शहरात जून महिन्यात अनेकदा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला असला, तरी प्रत्यक्षात मात्र पावसाअभावी पुणे कोरडेच राहिले आहे. पुण्यात सरासरी 119.1 मिमी पाऊस पडतो. गेल्या पंचवीस वर्षांत जून महिन्यात सरासरी 150 ते 200 मिमी पाऊस पडला आहे. त्यातही यंदा हा पाऊस 24 दिवसांत फक्त 34 मिमी पडला आहे.

तारीख पावसाचा अंदाज प्रत्यक्ष पाऊस
1 जून तुरळक नाही
2 जून ढगाळ वातावरण नाही
3 जून ढगाळ वातावरण नाही
4 जून हलका पाऊस नाही
5 जून हलका पाऊस नाही
6 जून मध्यम पाऊस नाही
7 जून ढगाळ वातावरण नाही
8 जून मुसळधार नाही
9 जून मुसळधार नाही
10 जून जोरदार पाऊस 25 मिमी (हंगामातील पहिला)
11 जून ढगाळ वातावरण नाही
12 जून ढगाळ वातावरण नाही
13 जून ढगाळ वातावरण नाही
14 जून ढगाळ वातावरण नाही
15 जून ढगाळ वातावरण नाही
16 जून ढगाळ वातावरण नाही
17 जून किंचित पाऊस नोंद घेण्याएवढा नाही
18 जून ढगाळ वातावरण नाही
19 जून हलका पाऊस नाही
20 जून मुसळधार 5 मिमी
21 जून मुसळधार 1.3 मिमी
22 जून ढगाळ वातावरण नाही
23 जून हलका पाऊस 0.4 मिमी
24 जून ढगाळ वातावरण नाही
25 जून ढगाळ वातावरण नाही

25 जूनपर्यंत फक्त 33.3 मिमी पाऊस
जून महिन्यात शहरात सरासरी 150 ते 200 मिमी पाऊस पडतो.
एकूण सरासरीत पुणे शहरात 85 टक्के पाऊस कमी आहे.
10 जून रोजी शहरात 25.6 मिमी पाऊस पडला. (जून महिन्यातील सर्वांत मोठा पाऊस)

यंदा जून महिन्यात पावसाने कमी हजेरी लावली. याचे कारण पुणे शहरात हवेचे दाब फारसे अनुकूल नाहीत. प्रत्येक भागात यंदा हवेचे असमान दाब आहेत. त्यामुळे यंदा शहरात सरासरीपेक्षा 85 टक्के कमी पाऊस पडला.

– अनुपम कश्यपी

हेही वाचा

राहाता पोस्ट ऑफिसमध्ये रेव्हेन्यू तिकिटांचा तुटवडा

स्नेहल बेंडके यांची ‘फिबा’ तांत्रिक समन्वयकपदी निवड

गोवा : उत्पादन शुल्कचे पथक कागदोपत्रीच ड्युटीवर; गोव्यातून दारु तस्करी सुरुच

Back to top button