Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन मंजूर | पुढारी

Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन मंजूर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तिला बुधवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. नवी मुंबई येथे दाखल अट्रोसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. त्यामुळे केतकीची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेवर (Ketaki Chitale) ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान केतकीने कळवा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर बुधवारी न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला. 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Back to top button