राज्यात अडीच हजार नवजात बालकांना संजीवनी..! | पुढारी

राज्यात अडीच हजार नवजात बालकांना संजीवनी..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आजारी आणि कमी वजनाच्या नवजात बालकांवरील उपचारांसाठी विशेष असे 53 नवजात काळजी कक्ष स्थापना करण्यात आले. गेल्या एका वर्षात या कक्षांमध्ये अत्यंत कमी आणि मध्यम वजनाच्या अडीच हजार बालकांवर यशस्वीरीत्या उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये 1 बालरोगतज्ज्ञ, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 इनचार्ज सिस्टर, 12 परिचारिका, 1 डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि 4 सहाय्यक कर्मचार्‍यांसह किमान 12 ते 16 खाटा असून, विशेष काळजीची आवश्यक असणार्‍या बालकांसाठी चोवीस तास सेवा दिली जाते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

कक्षांमध्ये युनिट रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपॅप मशिन, मॉनिटर्स यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजारी नवजात अर्भकांना प्रामुख्याने हायपोथर्मिया, सेप्सिसन्फेक्शन, कावीळसाठी उपचार व प्रतिजैविक यांसारख्या सेवा पुरविल्या जातात. विशेष नवजात काळजी कक्षांमध्ये 1 बालरोगतज्ज्ञ, 2 वैद्यकीय अधिकारी, 1 इनचार्ज सिस्टर, 12 परिचारिका, 1 डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि 4 सहाय्यक कर्मचार्‍यांसह किमान 12 ते 16 खाटा असून, विशेष काळजीची आवश्यक असणार्‍या बालकांसाठी चोवीस तास सेवा दिली जाते, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. कक्षांमध्ये युनिट रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्फ्युजन पंप, सीपॅप मशिन, मॉनिटर्स यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजारी नवजात अर्भकांना प्रामुख्याने हायपोथर्मिया, सेप्सिसन्फेक्शन, कावीळसाठी उपचार व प्रतिजैविक यांसारख्या सेवा पुरविल्या जातात.

आजारांच्या निदानासह कक्षात अद्ययावत सुविधा

  •  आजारांचे निदानकरण्यात येते.
  •  प्रयोगशाळेतील चाचण्या करण्यात येतात.
  •  आवश्यक असल्यास मोफत रक्त देण्यात येते. मोफत पोषक आहार दिला जातो.
  • आजाराच्या तीव्रतेनुसार वर्गीकरण करण्यात येते.
  •  कमी वजनाच्या बालकांचा आंतररुग्ण कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने नवजात शिशूंना कांगारू मदर केअर देण्यात येते.
  •  डिस्चार्ज बालकांच्या आरोग्याचा पाठपुरावा वैद्यकीय अधिकारी/आरोग्य कर्मचारी/आशा यांच्यामार्फत करण्यात येतो.
  •  बालक रुग्णालयात दाखल असताना पालकांना आजारी बालकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.
  •  वैद्यकीय महाविद्यालयांतील व खासगी संस्थामधील नवजात शिशूंचे तज्ज्ञांकडून मूल्यमापन व मार्गदर्शन करण्यासाठी विशेष भेटी देण्यात येतात.
  •  नवीन पदभरती झालेल्या बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स यांना प्रशिक्षण देण्यात येते.

हेही वाचा

Back to top button