पुणे : ठाकरवाडी, विकासवाडी अंगणवाडीचे काम अपूर्ण | पुढारी

पुणे : ठाकरवाडी, विकासवाडी अंगणवाडीचे काम अपूर्ण

महाळुंगे पडवळ : पुढारी वृत्तसेवा : महाळुंगे पडवळ, ठाकरवाडी, विकासवाडी (ता. आंबेगाव) येथील अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण असल्याने मुले इमारतीबाहेरील जागेत जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. अपूर्ण कामामुळे पालक संतप्त झाले आहेत, अशी तक्रार हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

तब्बल 12 वाड्या-वस्त्यांसह सुमारे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या महाळुंगे पडवळ गावात 7 अंगणवाड्या आहेत. पुणे जिल्हा परिषदअंतर्गत पंचायत समिती बांधकाम विभाग उत्तर यांचेकडून अंगणवाड्यांची कामे सुरू आहेत. सर्व कामांची ठेकेदार एजन्सी ग्रामपंचायत महाळुंगे पडवळ आहे, असे चासकर यांनी सांगितले.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

ठाकरवाडी येथील अंगणवाडीचे काम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. इमारतीवर प्लास्टर करण्यात आलेले नाही. जमिनीवर फरशी बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे मुलांनी शिक्षणासाठी कोठे बसावयाचे हा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. अपूर्ण कामकाजाबाबत ग्रामपंचायत प्रशासन उदासीन आहे. तक्रारीची दखल घेत नसल्याने पालकांसमवेत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा बाबाजी चासकर यांनी दिला आहे.

Back to top button