Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे अपघात: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर, आजोबाही संशयाच्या भोवऱ्यात | पुढारी

Pune Porsche Car Accident | पुणे पोर्शे अपघात: अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर, आजोबाही संशयाच्या भोवऱ्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क: पुणे पोर्शे अपघाताला प्रख्यात बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा कारणीभूत ठरला. यानंतर बिल्डर पितापुत्रांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात (Pune Porsche Car Accident) आणण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात रविवार १९ मे रोजी भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या पोर्श कारने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्याने यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल या दोघांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आरोपीचे आजोबा देखील संशयाच्या भोवऱ्यात (Pune Porsche Car Accident) अडकले आहेत.

Pune Porsche Car Accident: काय आहे प्रकरण?

  • पुण्यात रविवारी (दि.१९) पहाटे भऱधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली, यात तरुण-तरुणी ठार
  • संशयित आरोपी अल्पवयीन; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांचा मुलगा
  • मुलाकडे वाहन परवाना नसताना वडिलांनी पोर्शे कार चालवायला दिली होती.
  • यानंतर अल्पवयीन मुलांचे वडील हे आरोपीच्या जाळ्यात अडकले.
  • यानंतर अल्पवयीन आरोपीचे आजोबां देखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. 

अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याची कळते. आरोपीचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांचे छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

हेही वाचा:

Back to top button