केएनके सोसायटीच्या रस्त्याची खोदाईने दुरवस्था; खोदून ठेवलेल्या रस्त्याकडे पथ विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

केएनके सोसायटीच्या रस्त्याची खोदाईने दुरवस्था; खोदून ठेवलेल्या रस्त्याकडे पथ विभागाचे दुर्लक्ष

कात्रज, पुढारी वृत्तसेवा: कात्रज-कोंढवा रस्त्यावरील केएनके सोसायटीतून जाणार्‍या 18 मीटर मुख्य रस्त्यावर एमएनजीएलची गॅस लाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली. त्यामुळे सुस्थितीतील डांबरी रस्त्याची दुरवस्था झाली. दोन महिने उलटून गेले तरी दुरुस्तीकडे पथ विभागाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर एमएनजीएल गॅस तसेच नामवंत केबल कंपन्याना लाईन टाकण्यासाठी मनपा प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. संबंधितांकडून मनपा प्रशासन प्रतिमीटरप्रमाणे पैसे भरून घेतले जातात, मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे वेळकाढूपणा केला जातो. रस्ते खोदाई केल्याने वाहनचालक व पादचारी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Desi Expendables : ‘देशी एक्सपान्डेबल’मध्ये दिसणार संजय दत्त, सनी देओल, जॅकी श्रॉफसह मिथुन चक्रवर्ती

कात्रज, सुखसागरनगर, राजस सोसायटी, संतोषनगर, दत्तनगर, भारती विद्यापीठ अशा भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कोट्यवधी निधीतून तयार करण्यात आलेले सुस्थितीतील डांबरी व काँक्रीट रस्ते खोदले जातात. दुरुस्तीच्या नावाखाली मलमपट्टी केली जाते. मात्र रस्ते पाहिल्यासारखे होत नाहीत. मनपा प्रशासनाने खोदाईस परवानगी दिल्यानंतर तात्काळ रस्ते दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

केएनके सोसायटीतील मुख्य रस्त्यावर एमएनजीएल गॅस लाईन टाकण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपूर्वी चांगल्या रस्त्याची खोदाई केली आहे. लाईन टाकल्यानंतर रहदारीच्या या रस्त्यावर तत्काळ दुरुस्ती केली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून येथे तत्काळ डांबरीकरण करावे.

                    -सुधीर डावखर

केएनके सोसायटी मुख्य रस्त्यावर एमएनजीएलने मनपाची परवानगी घेऊन रस्त्याची खोदाई केली होती. दुरुस्ती करण्याची जबाबदारी मनपाची आहे. त्यानुसार उद्या खोदाई ठिकाणी डांबरीकरण काम करणार आहे.

                          -विकास मोळावडे, कनिष्ठ अभियंता पथ.

Back to top button