Desi Expendables : ‘देशी एक्सपान्डेबल’मध्ये दिसणार संजय दत्त, सनी देओल, जॅकी श्रॉफसह मिथुन चक्रवर्ती | पुढारी

Desi Expendables : ‘देशी एक्सपान्डेबल’मध्ये दिसणार संजय दत्त, सनी देओल, जॅकी श्रॉफसह मिथुन चक्रवर्ती

पुढारी; ऑनलाईन डेस्क : तुम्ही हॉलिवूडचा ॲक्शन स्टार सिल्वेस्टर स्टॅलोन याचा धमाकेदार ‘एक्सपान्डेबल’ (Expendables) हा मारधाड चित्रपट पाहिला असालच. या चित्रपटाचे पुढे दोन सिक्वेल देखिल आले होते. अत्यंत ॲक्शन पॅक आणि फूल ड्रामा यामध्ये ठासून भरला होता. आपल्या जुन्या ॲक्शन हिरोला पाहून जगभरातील स्टॅलोनचे चाहते देखिल आनंदीत झाले होते. तसेच त्या चित्रपटात अनेक इतर ॲक्शन हिरो देखिल होते. आता त्याच धरतीवर बॉलिवूडमध्येही देशी एक्सपान्डेबल (Desi Expendables) चित्रपट येत आहे. यात संजय दत्त (sanjay dutt), सनी देओल (sunny deol), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि मिथुन (Mithun Chakraborty) हे ८० च्या दशकातील स्टार पुन्हा एकदा आपणाला ॲक्शनमोडमध्ये पहायला मिळणार आहेत.

अद्याप या देशी एक्सपान्डेबल (Desi Expendables) चित्रपटाचे नाव ठरलेलं नाही. पण, या चित्रपटाच्या कथेचे आणि निर्मितीच्या नियोजनाचे काम जवळजवळ पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ओम’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक अहमद खान झी स्टुडिओ सोबत हा चित्रपट घेऊन येत आहेत. अहमद खान (Director Ahmed Khan) आणि झी यांनी या चित्रपटातील स्टारकास्ट फायनल केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक चौहान (Vivek Chauhan) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपणास ८० च्या दशकातील ॲक्शन हिरो संजय दत्त, सनी देओल, जॅकी श्रॉफ आणि मिथुन यांना पाहता येणार आहे.

सिने रसिकांना ८० च्या दशकातील या ॲक्शन हिरोंना पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहताना नक्कीच मजा येईल. ८०- ९० चे दशक गाजवलेल्या या अभिनेत्यांना सध्या देखिल चांगली फॅन फॉलोईंग आहे. जॅकी श्रॉफ आणि मिथुन सध्या चरित्र अभिनेते म्हणून भूमिका पार पडाताना दिसतात. सनी देओल सध्या साईड लाईन झालेला पाहण्यास मिळत आहे. अलिकडे त्याच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट एक प्रकारे पुनर्रागमन ठरु शकेल. दुसरीकडे संजय दत्त मात्र अद्याप बॉलिवूडमध्ये दबदबा ठेऊन आहे.

संजय दत्तचा एक प्रकारे चांगला काळ चालू आहे. त्याच्या वेळचे सर्वच अभिनेते काहिसे मागे पडले आहेत किंवा त्यांना दुय्यम भूमिका पार पाडव्या लागतात. पण, संजय दत्तने मात्र मिळेल त्या भूमिकेचे सोने करत आपला दबदबा व फॅनफॉलोईंग कायम ठेवला आहे. तसेच केजीएफ सारख्या चित्रपटाने विक्रमी कमाई केल्यानंतर पुन्हा एकदा संजय दत्तचा भाव वधारला आहे.

या ॲक्शन चित्रपटाच्या कथा, पटकथा काम पूर्ण झालेले आहे. या चारही कलाकारांना यामध्ये न्याय देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय लवकरात लवकर हा चित्रपट फ्लोअरवर जाणार आहे. या चित्रपटाचे लोकेशन्स देखिल ठरले आहेत. बहुतांशी चित्रपटाचे चित्रिकरण बाहेर केले जाईल तर काही मुंबईतील स्टुडिओ मधील केले जाईल.

Back to top button