मातब्बर सुटले, महापालिकेच्या आरक्षण सोडतीत अनेकांना दिलासा | पुढारी

मातब्बर सुटले, महापालिकेच्या आरक्षण सोडतीत अनेकांना दिलासा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महिला आरक्षणानंतरही अनेक मात्तबर आणि माजी नगरसेवकांच्या महापालिका निवडणूकीचा लढतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास 90 टक्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक इच्छुकांना निवडणूक लढविणे शक्य होणार असून महिला आरक्षण सोडतीनंतर सर्वांनीच सुटेकचा श्वास सोडल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या 58 प्रभागांमधील अनुसुचित जाती, जमाती आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत मंगळवारी काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्याने या आरक्षणाशिवायच ही सोडत काढण्यात आली. त्याचा मोठा फायदा खुल्या वर्गातील इच्छुकांना झाला आहे.

Singer KK : प्रसिद्ध गायक के.के. यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

प्रत्येक प्रभागात किमान एक जागा सर्वसाधारण म्हणून खुली झाल्याने सर्व पक्षातील अपवाद वगळता सर्वच माजी नगरसेवकांना पुन्हा लढता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप, दत्ता धनवकडे, अरविंद शिंदे, गणेश बिडकर, आबा बागुल, हेमंत रासने, योगेश मुळीक, डॉ. सिध्दार्थ धेंडे, दिलीप बराटे, अविनाश बागवे, वैशाली बनकर, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, विशाल तांबे, बाबुराव चांदेरे, दिपक मानकर, दिपाली धुमाळ सुभाष जगताप, वसंत मोरे या अशा प्रमुख सर्व माजी माननीयांचे प्रभाग आरक्षणानंतरही त्यांच्यासाठी सोईचे झाले आहेत.

Solapur : आवाज करू नको, नाहीतर गोळ्या घालीन

मात्र, अनुसुचित जातीच्या महिला आरक्षणाचा फटकाही काही माजी माननीयांना बसणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भैय्यासाहेब जाधव, अविनाश साळवे, राहूल भंडारे, विरसेन जगताप यांना महिला आरक्षित जागांमुळे एकतर घरी बसावे बसावे लागेल अथवा अन्य प्रभागातून निवडणूक लढावी लागणार आहे.

छत्रपती राजाराम महाराज : मराठा पुरोहितांकडून राज्याभिषेक करुन घेणारा राजा

दरम्यान गतपंचवार्षिकमध्ये महापालिकेत भाजपचे शंभर नगरसेवक होते, तीन सदस्यीय प्रभाग रचनेत अनेक प्रभागात भाजपचे नगरसेवक एकत्र येऊन कोंडी झाल्याचे चित्र होते. मात्र, आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागात आता ही कोंडी फुटली असून काही मोजक्या प्रभागात मात्र उमेदवारीचा संघर्ष होणार असल्याचे स्पष्ट आहे.

पक्षातरांच्या उड्यांना सुरवात !

महापालिकेच्या आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता कोणत्या प्रभाग कोण कोणासमोर येणार यासंबधीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता थांबलेल्या पक्ष प्रवेशाच्या उड्यांना सुरवात होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील गतपंचवार्षिकमधील सत्ताधारी भाजपमधून अनेक नगरसेवक प्रामुख्याने राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आरक्षण सोडतीनंतर जे चित्र स्पष्ट झाले आहे. ते पाहता भाजपमधून पक्षातंराच्या उड्यांना ब्रेक लागण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button