पुणे : पीएमपीएल बस थांब्यावर थांबतच नाही हो…!; २ हजार तक्रारी | पुढारी

पुणे : पीएमपीएल बस थांब्यावर थांबतच नाही हो...!; २ हजार तक्रारी

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाला वर्षभरात प्रवाशांकडून 2 हजार 51 तक्रारी प्राप्त झाल्या असून, यात प्रवाशांशी उद्धट वागणे आणि बस न थांबविण्याच्या आहेत. सर्वाधिक तक्रारी चालक-वाहकांबद्दल असल्याचे समोर आले आहे.

#CUET : देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये आता कॉमन एट्रांस टेस्टमधूनच प्रवेश मिळणार

पुणे महानगर परिवहन महामंडळ 2 हजारांपेक्षा अधिक बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा देत आहे. ही व्यवस्था प्रवाशांना कशा प्रकारे मिळते ? प्रवाशांना काही तक्रारी आहेत का? याच्या माहितीसाठी प्रशासनाने 24545454 हा टोल फ—ी क्रमांक सुरू केला आहे. या टोल फ्री क्रमांकाचे कामकाज कशाप्रकारे चालते. त्यातून प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण होते की नाही, याची पाहणी दै.‘पुढारी’कडून करण्यात आली.

मुंबईतील हिरानंदानी समूहावर आयकर विभागाची छापेमारी

पीएमपीकडील कामकाजाबद्दलच्या वार्षिक अहवालातूनही चालक-वाहक वेगाने वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे. उद्धट वर्तनाबाबत प्रशासनाकडून चालक-वाहकांवर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येते, परंतु प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींवरून त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नसल्याचे दिसून येत आहे.

Russia-Ukraine War : राम चरणनं युक्रेनमधील अंगरक्षकाला पाठवली आर्थिक मदत

पीएमपीचे पुणे व पिंपरीतील डेपो

1) बालेवाडी डेपो 2) भेकराईनगर डेपो 3) भोसरी डेपो 4) हडपसर डेपो 5) कात्रज डेपो 6) कोथरूड डेपो 7) मार्केटयार्ड डेपो 8) निगडी डेपो 9) नतावाडी डेपो 10) पिंपरी डेपो 11) पुणे स्टेशन डेपो 12) शेवाळवाडी डेपो 13) स्वारगेट डेपो.

केंद्रीय तपास यंत्रणांचा खुळखुळा झालाय : संजय राऊत

या क्रमांकावर करा तक्रार…

पीएमपीमध्ये प्रवास करताना कोणतीही समस्या आल्यास त्यांनी पीएमपीच्या 020-24545454 या क्रमांकावर तक्रार करावी. तसेच, याशिवाय ई-मेलआयडी, मोबाईलअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, वेब, इन्स्टाग्राम, ट्विटरवर तक्रार करता येऊ शकते.

चालक-वाहकांच्या बहुतांश तक्रारी आम्हाला येत असतात. आम्ही सातत्याने त्यांच्यावर कारवाई करतो. यात दंडात्मक, निलंबन, पगारवाढ रोखणे, याशिवाय मोठी तक्रार असल्यास बडतर्फीचीसुद्धा कारवाई केली जाते.
                                         – दत्तात्रय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

पीएमपीला आलेल्या तक्रारी (वार्षिक अहवाल-2021)

  • बस थांब्यावर थांबली नाही 636
  • थांब्यावर बस उशिरा आली 220
  • वाहकाने चुकीचे तिकीट दिले 68
  • अतिवेगाने बस चालविणे 223
  • प्रवाशांशी उद्धट वर्तन 362
  • बसचालवताना मोबाईलचा वापर 26
  • बसद्वारे वाहतूक नियमभंग 43
  • बस अस्वच्छ 23
  • प्रवासी चढताना आणि उतरताना बस न थांबविणे 176
  • इतर तक्रारी 274
  • एकूण तक्रारी 2051

Back to top button