Russia-Ukraine War : राम चरणनं युक्रेनमधील अंगरक्षकाला पाठवली आर्थिक मदत | पुढारी

Russia-Ukraine War : राम चरणनं युक्रेनमधील अंगरक्षकाला पाठवली आर्थिक मदत

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथचा मेगा पॉवरस्टार राम चरण त्याच्या आरआरआर या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो अभिनयासाठी तसेच उदार मनासाठीही प्रसिद्ध आहे. काही अभिनेते नेहमीच लोकांच्या मदतीसाठी हात पुढे करतात. यावेळीही असेच काहीसे घडले. अभिनेत्याने सध्या युक्रेनमध्ये असलेल्या त्याच्या एका अंगरक्षकाला आर्थिक मदत पाठवली आहे.

RRR चित्रपटाचे काही भाग युक्रेनमध्ये शूट करण्यात आले आहे. त्यावेळी रस्टी हा राम चरणचा बॉडीगार्ड होता. परंतु रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना, रस्टी आपल्या ८० वर्षीय वडिलांसोबत देशाचे रक्षण करण्यासाठी सैन्यात सामील झाला.

रस्टी नावाचा या व्यक्तीने रामचरणच्या बॉडीगार्डचे काम केले होते. तो म्हणाला की- ‘हाय, माझे नाव रस्टी आहे. राम चरण युक्रेनमध्ये शूटिंग करत असताना मी त्याचा अंगरक्षक होतो. काही दिवसांपूर्वी त्यांचा मला फोन आला आणि माझी तब्येत विचारली. मी सैन्यात भरती झाल्याचे सांगितले. त्यांनी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आणि मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले. ही त्यांची औदार्यता आहे.”

रस्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. युक्रेनसाठी केवळ राम चरण बॉडीगॉर्डलाच मदत केलेली नाही तर एसएस राजमौली हे त्यांच्या टीममध्ये काम केलेल्या युक्रेनियन लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्याने आर्थिक मदत देखील केली आहे. जेणेकरून पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळेल.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनंतर RRR च्या नटू-नाटू गाणे आणि फाईट सीन युक्रेनमध्ये शूट करण्यात आले, जो चित्रपटाचा शेवटचा भाग होता. हे गाणे चांगलेच लोकप्रिय झाले आहे. राजामौलीच्या आरआरआरच्या ट्रेलरने आधीच मोठी खळबळ माजवली आहे. राम चरण, ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २५ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Back to top button