Swati Maliwal: ‘आज सिसोदिया असते तर’; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील घटनेवर स्वाती मालीवाल झाल्या भावूक | पुढारी

Swati Maliwal: 'आज सिसोदिया असते तर'; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील घटनेवर स्वाती मालीवाल झाल्या भावूक

पुढारी ऑनलाईन डेस्क: आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमार यांना ‘आप’ संरक्षण देत असल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी लावलेले सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याबाबतही बोलले आहे. यावेळी त्यांनी (Swati Maliwal) दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आज येथे पाहिजे होते, म्हणत १३ मे रोजी घडलेल्या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भातील एक्स पोस्ट त्यांनी केली आहे. दरम्यान कोर्टाने बिभव कुमारला पाच दिवसांची पोलिस कोठडी देखील सुनावली आहे.

Swati Maliwal: एक काळ होता निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी ‘आप’ रस्त्यावर, पण आज…

स्वाती मालीवाल यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक काळ असा होता की निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरायचो, आज 12 वर्षांनंतर आपण सर्वजण सीसीटीव्ही फुटेज गायब करून फोन फॉरमॅट करून आरोपींला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर इतका जोर दिला गेला असता, तर आज ते इथे असते आणि कदाचित माझ्याबाबतील इतक्या वाईट गोष्टी झाल्या नसत्या, असे देखील मालीवाल यांनी म्हटले आहे.

‘या’ घटनेमागे भाजपचे षड्यंत्र- ‘आप’चा आरोप

स्वाती मालीवाल यांनी बिभववर मारहाणीचा आरोप केला होता. बिभवने त्यांना थप्पड मारली, पोटात लाथ मारली आणि टेबलावर डोकं आपटल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले असून, हे भाजपचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button