पुणे : दूधभेसळीविरोधात ‘एफडीए’ सरसावली | पुढारी

पुणे : दूधभेसळीविरोधात ‘एफडीए’ सरसावली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

भेसळयुक्त दूध उत्पादकांनी थैमान घातल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पुणे अन्न व औषध प्रशासन कार्यालय (एफडीए) सरसावले आहे. पुणे कार्यालयाने विविध स्तरांवर नमुने घेणे, धाडी, जप्तीसारखी कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईस सुरुवात केली आहे.

उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही याची हमी दिल्यास विचार करू : उदय सामंत

बारामतिमध्ये धाड

‘एफडीए’ने 21 जानेवारीला साई ट्रेडिंग कंपनीच्या बारामती येथील गोदामावर धाड टाकून व्हे पावडरचे 8 नमुने घेऊन उर्वरित 7 लाख 12 हजार 264 किमतीचा साठा जप्त केला. हे व्यावसायिक विनापरवाना घाऊक विक्रेत्याकडून विविध प्रकारच्या खरेदी-विक्रीचा तपशील ठेवत नव्हते. तसेच, सदर साठ्याची विक्री दूधभेसळीकरिता होत असल्याच्या संशयावरून हा साठा जप्त केला आहे. या प्रकारच्या व्यावसायिकांनी आवश्यक परवाना घेऊनच व्यवसाय करावा व त्यांच्याकडील सर्व साठ्याचा खरेदी-विक्रीचा तपशील अद्ययावत ठेवण्याची दक्षता घ्यावी, असे एफडीएकडून सांगण्यात आले आहे.

उ. प्रदेश विधानसभा निवडणूक : स्वामी प्रसाद मौर्य यांच्‍या मुलाला ‘सपा’ने डावलले

कायद्यातील मानकाप्रमाणे दूध असल्याची खात्री करूनच ते पुढील प्रक्रियेसाठी स्वीकारावे. जनतेस निर्भेळ दूध मिळण्याकरिता हे प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नामध्ये सहकार्य करावे. कायद्याअंतर्गत तरतुदींचा भंग करून व्यवसाय करणार्‍या सर्व स्तरावरील दूध व्यावसायिकांविरुद्ध प्रशासन यापुढेही कारवाई करणार आहे,’ असा इशारा पुणे जिल्ह्यातील सर्व दूध व्यावसायिक दूधसंकलन केंद्र, दूध प्रक्रिया केंद्र (डेअरी) यांना एफडीएने दिला आहे.

Covid-19 : दिल्लीत लवकरच निर्बंध हटविले जाणार : केजरीवाल

या पूर्वी एफडीएने गेल्या वर्षी दि. 8 जुलै रोजी नगर जिल्ह्यातून पुरवठा झालेल्या दुधाच्या टँकरवर बारामती येथे कारवाई करीत 2 लाख 29 हजार रुपयांचा 8 हजार 497 लिटर दूधसाठा जप्त करून नष्ट केला होता. सदर नमुन्याचा अहवाल मानवी सेवनास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने सदरप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, दि. 29 जुलै 2021 लाकडी (ता. इंदापूर) येथील दूधविक्रेता राजाराम खाडे यांच्या ताब्यात भेसळयुक्त पदार्थ व दुधाचा साठा आढळून आल्याने त्यांच्याकडून गाय दूध, व्हे पावडर व लिक्विड पॅराफिनचे नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त केला होता. याप्रकरणीही पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील दूधसंकलन केंद्रामध्ये भेसळ पदार्थ व्हे पावडर आढळली. त्यांच्याकडून 51 हजार रुपये किमतीची 300 किलो व्हे पावडर जप्त केली होती.

अभिजीत बिचुकले म्हणतो, “…असे १०० सलमान गल्ली झाडायला दारात ठेवतो”

Back to top button