नाशिक : आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही; जारंगे-पाटील | पुढारी

नाशिक : आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही; जारंगे-पाटील

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या समितीला पाच हजार पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता सरकारला कुणबी आरक्षण द्यावं लागेल. मी आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. ही शेवटची आणि अंतिम लढाई असेल, असे प्रतिपादन मनोज जारंगे-पाटील यांनी शहरात केले.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघालले मनोज जरागे पाटील यांनी रविवारी (दि.8) रात्री उशिरा शहरातील सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली.

जारंगे-पाटील पुढे म्हणाले, मराठा आरक्षण लढाई गेल्या अनेक वर्षपासून सुरु आहे. 29 ऑगस्टला अंतरवली सर्टीत आंदोलन सुरु झाले. तिसऱ्या दिवशी काय झाले माहिती नाही. शांततेत आंदोलन सुरु होते. पण लाठीहल्ल झाला. पोरच्या अंगात 35 छरे घुसले. ते आता मुंबईत उपचार घेत आहेत. आमचं असे काय चुकले जे आमच्यावर हला केला होता. आम्हाला धिंगाणा करायचा असता तर 29 लाच केला असता. पण मी व्यासपीठा वरून ऐका शब्दात शान्त बसा बोललो. तेव्हा पोर तिथं शांत बसले. मराठ्यांची औलाद कधी धिंगाणा करू शकत नाही. पण हला का केला हे आजपर्यंत सरकारने उत्तर दिले नाही.

कुणबी प्रमाणपत्र मागितले, आमच्या हक्कच आरक्षण द्या मागणी केली म्हणून हल्ल केला का.? याचं उत्तर शासनाकडे नाही. हे आंदोलन आता इतकं पेटलं की देशात आता ते मोडायची हिम्मत कोणामध्ये नाही. तत्पूर्वी मराठा समाजातर्फे त्यांचे पुष्पवृष्टी आणि टाळ-मृदूंगाच्या वादनाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जारंगे-पाटील यांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत केली. तसेच उपोषणकर्ते यांचा सत्कार केला.

समाज बांधवांचा उत्साह

रात्री उशिरापर्यंत समाजातील बांधव महिला तसेच बालक जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, मी मराठा मी कुणबी अशा घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला आरक्षण देतील अशी आशा समाजाकडून व्यक्त करण्यात आली.

एक मराठा ग्रेट मराठा

मराठा समाजाकडून यापूर्वी एक मराठा अशी घोषणा दिली जात होती. त्याच्यासोबत आता जारंगे पाटील यांच्यासाठी एक मराठा ग्रेट मराठा अशी घोषणा देण्यात आली. दरम्यान, 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत आपल्या कुटुंबास उपस्थित राहावे. तसेच कोणीही त्या दिवशी मद्य प्राशन करणार नाही, असा ठराव यावेळी करण्यात आला.

ना. भुजबळ यांना टोला

काही जाती आरक्षण नसताना त्या आरक्षणात गेल्या. भारतात एक ही जात मागास म्हणून सिद्ध झाले नाही तरी आरक्षण दिले गेले नाही. व्यवहारानुसार जातीला आरक्षण मिळालं. पण आपण आरक्षण समजून घेतलं नाही. सर्वच पक्षाना मोठं केले. दरम्यान, सकाळपासून बोलतो आहे म्हणून आवाज बारीक आहे. नाहीतर तुमचा नेता बोलायचा नाशिकला आला तर आवाज छोटा झाला असा टोला मंत्री छगन भुजबळ यांना लागवला.

Back to top button