नाशिक : सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचे अपघाती निधन | पुढारी

नाशिक : सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवानाचे अपघाती निधन

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील रायपूर येथील रमेश म्हातोरबा गुंजाळ (वय 37) हे भारतीय सुरक्षा दलात कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वीच रमेश सुट्टी टाकून गावाकडे आले होते. गावी आई-वडिलांना भेटून दुचाकीवरून मनमाड कडे जात असताना समोरून येणाऱ्या चार चाकी वाहनाची टायर फुटून ती दुचाकीवर जाऊन आदळली.

या भीषण अपघातात सुट्टीवर आलेल्या बीएसएफ जवान रमेश म्हातोरबा गुंजाळ (वय 37) या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. शासकीय इतमामात आज बुधवारी (दि.१५) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत..

Back to top button