दीपा-कार्तिक यांची झाली पोलखोल, शेअर केले सेटवरचे भन्नाट किस्से | पुढारी

दीपा-कार्तिक यांची झाली पोलखोल, शेअर केले सेटवरचे भन्नाट किस्से

पुढारी ऑनलाईन

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. छोट्या उस्तादांचा आत्मविश्वास आणि उत्साह जजेसनाही थक्क करुन टाकतो आहे. बच्चे कंपनीच्या या सुरेल मैफलीत आनंदाचे रंग भरण्यासाठी हजेरी लावली ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कलाकारांनी. दीपा-कार्तिक यांनी सेटवरचे भन्नाट किस्से शेअर केले आहेत.

या खास पाहुण्यांच्या हजेरीने सेटवरही नवा उत्साह संचारला होता. या धमाल एपिसोडमध्ये या दोघींनी सेटवरचे काही भन्नाट किस्से शेअर केले. दीपा आणि कार्तिक यांच्यामध्ये सेटवर सर्वात उशिरा कोण येतं? सर्वात जास्त रिटेक कोण घेतं? सेटवर सर्वात जास्त फोनमध्ये कोण गुंग असतं? अशा अनेक गोष्टींचं पोलखोल करत त्यांनी सेटवर धमाल उडवून दिली. सेटवर पडद्यामागे नेमकं काय घडतं हे जाणून घ्यायची प्रत्येकालाच उत्सुकता असते. त्यामुळे हा खेळ सर्वांनीच मनापासून एन्जॉय केला.

या खास भागाची झलक येत्या शनिवारी म्हणजेच ११ आणि १२ डिसेंबर राेजी स्टार प्रवाहवर.

Back to top button