जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन, मानवी साखळी द्वारे केली ‘सही’ | पुढारी

जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन, मानवी साखळी द्वारे केली 'सही'

इंदिरानगर- पुढारी वृत्तसेवा; इंदिरानगर येथील सुखदेव एज्युकेशन संस्था, नाशिक संचलित सुखदेव प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॅालेज तसेच सुखदेव प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा विल्होळी यांच्या संयुक्त विदयमाने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मानवी साखळीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सही तयार करून अनोखी जयंती साजरी केली. सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी या मानवी साखळीत आपला सहभाग नोंदवला.

संस्थेच्या सुखदेव प्राथमिक शाळेचे मुख्याध्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेनुसार उपशिक्षक सुनिल जाधव व कलाशिक्षक संदीप नागरे यांनी इंदिरानगर येथील शाळेच्या मैदानावर ५० फुट बाय १५ फुट असे रेखाटन करून विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची सही तयार केली. यापूर्वी संस्थेने संयुक्त जयंतीनिमित्त १८ तास वाचन स्पर्धा घेतली होती. त्यास विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. जयंती मिरवणुकीत चित्ररथ सहभागी केला होता. त्यास सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार देखील मिळाला होता. दरवर्षी संस्थेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या लेझिम, ढोल पथकासह १३ एप्रिल रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात असतात. संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतली जाते. यंदा मात्र मानवी साखळी तयार करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुखदेव एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, उपाध्यक्ष रंजय काळे, सरचिटणीस संजय काळे, चिटणीस विजय काळे, नगर भूमापन अधिकारी राजेश नितनवरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड, ललिता काळे, वैभव काळे, सरला गाढे, प्रियांका गाणार, प्राचार्य बाबासाहेब खरोटे, ज्येष्ठ पत्रकार भगवान पगारे आदी मान्यवर उपस्थित होते. सही बनवताना काढलेल्या चित्रफितीचे अनावरण आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त प्रदीप पोळ, आर पी आय (आठवले गट) नेते प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

उपक्रम यशस्वीतेसाठी कविता पवार, मनिषा बोरसे, भारती जाधव, रेखा बागुल, अनिता अहिरे, मनिषा खरे, अनिता गुंजाळ, अमित पवार, प्रकाश सोनवणे, वैशाली साळवे , जलराम शिंगाडे, रोहिदास पांडव, मुसर्रत नायकुडी, निलेश गांगुर्डे आदीं शिक्षकवृंदांसह नंदकुमार झनकर, श्रीमंत डंबाळे व कमलाकर खैरनार यांसह अन्य शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी प्रयत्नशील होते.

हेही वाचा –

Back to top button