Jalgaon Crime : म्हैस चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

Jalgaon Crime : म्हैस चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल, जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ

जळगांव ; पुढारी वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घातलेला असून जळगाव शहर, भुसावळ, मुक्ताईनगर या ठिकाणी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, म्हैस व मोटरसायकल यांची चोरी करुन चार लाख 29 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जळगांव शहरातील गांधीनगर विष्णू विवाह महाराष्ट्र बँक जवळ मनियार होलसेल दुकानांमध्ये अज्ञात चोराने दुकानाचे पत्रे कापून कॅश काऊंटर मध्ये ठेवलेले वीस हजार तसेच व कपाटातील 30 हजार त्याच्यासह बँकांची चेक बुक असे एकूण 50 हजार रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक चेतन सुलक्षणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील प्लॉट नंबर 40, अयोध्या नगर जळगाव रोड, येथे राहणारे उमेश बाळू चिमणकर यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्याचे पेंडल सोन्याची मंगल पोत सोन्याचा कानातील दागिना सोन्याची अंगठी लॅपटॉप वीस हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख 59 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले.

शहरातील लक्ष्मी नगर प्लॉट नंबर 9 संचार नगर येथे राहणारे एकनाथ यशवंत पाटील यांच्या घरासमोरून 50 हजाराची होंडा कंपनीची युनिकॉन मोटरसायकल अज्ञात चोरट्यानी लंपास केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा राहणारे विजय सुधाकर पाटील या शेतकऱ्याची 70 हजार रुपये किमतीची म्हैस संशयित आरोपी शेख रहीम शेख बशीर पटेल याने चोरून नेली म्हणून मुक्ताईनगर पोलिसांत विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button