Bengaluru news : मेडिकल विद्यार्थ्यांनी केला रुग्णांच्या बेडवर डान्स; रिल्स व्हायरल

Bengaluru news
Bengaluru news

बंगळूर : सोशल मीडियावर रिल्ससारखे स्वत:चे व्हिडीओ तयार करण्याची काहींना हौस असते. असाच एक प्रकार कर्नाटकमधल्या गदग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी दहा दिवसांसाठी वाढविण्यात आला आहे. ( Bengaluru news )

संबंधित बातम्या 

या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील तयार केल्यानंतर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र, या विद्यार्थ्यांनी नियमांचे उल्लंघन केले. 'रील इट, फील इट' अशी टॅगलाईन घेऊन विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या बेडवर बसून रील बनवली होती. या रिल्समध्ये विद्यार्थी रुग्णालयाच्या आवारात कधी नाचत तर कधी रुग्णाचा पलंग, स्टेथोस्कोप आदी उपकरणांचा वापर करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांचे इन्स्टाग्राम पेज पाहिल्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय गोष्टी शिकण्याऐवजी त्यांनी रील बनवण्यातच जास्त वेळ वाया घालवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणखी दहा दिवस वाढवले आहे. ( Bengaluru news )

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news