पिंपळनेर : चिकसे शिवारातील वाळू माफियांवर कारवाई करा – उबाठा शिवसेना | पुढारी

पिंपळनेर : चिकसे शिवारातील वाळू माफियांवर कारवाई करा - उबाठा शिवसेना

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील चिकसे येथील वटखळ व पांझरा नदीच्या संगमावर अवैध उत्खनन होत आहे. वाळू माफियांनी कोणत्याही महसूल प्रशासनाची रॉयल्टी घेतली नसुन शासनाचा कोणताही परवाना नसतांना या भागात खुलेआम उत्खनन सुरु आहे. याबाबत पिंपळनेर, चिकसे येथील शेतकऱ्यांनी (शिवसेना उ.बा.ठाकरे गट) तहसीलदारांना निवदेन दिले.

वाळू उत्खनानाबाबत येथील स्थानिक शेतकऱ्यांनी जाब विचारला असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते. महसूल प्रशासनाला व पिंपळनेरचे अप्पर तहसीलदारांना आम्ही हफ्ते देतो म्हणून आमचे कोणतेही अधिकारी काहीच करू शकत नाही असे उत्तर पिंपळनेर, चिकसे येथील शेतकऱ्यांना मिळाले. त्यामुळे प्रशासनाची याबाबत काहीच जबाबदारी नाही का? प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करावी तसेच शनिवार- रविवार या दोन दिवशी महसूल विभागातील तलाठी ग्रामसेवकांना आदेश देऊन कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती करण्यात आली असून (शिवसेना उ.बा.ठाकरे गट) आमच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये असे प्रशासनास सांगण्यात आले. आंदोलन झाल्यास याला सर्वस्वी अप्पर तहसिलदार कार्यालयातील अधिकारी जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना जिल्हा समन्वय किशोर अप्पा वाघ, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, तालुका सहसंघटक तुषार गवळी, उपतालुकाप्रमुख वन्या दादा व युवा सेनेचे मयूर नांद्रे आणि घोडदे, कुडाशी, पिंपळनेर परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button