Nashik News I आयमात माघारीची मुदत एक दिवसाने वाढविली | पुढारी

Nashik News I आयमात माघारीची मुदत एक दिवसाने वाढविली

नाशिक (सिडको) : वृत्तसेवा
उद्योजकांची संघटना असलेली आयमाचा (Ambad Industries & Manufactures Association) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत मंगळवारी (दि. 23) अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत शरद दातीर यांनी अर्ज माघार घेतला, तर दुसरे उमेदवार अनिल आमले यांनी माघारीस नकाराची भूमिका जाहीर केल्याने निवडणुकीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अर्ज माघार घेण्याची मुदत एक दिवसाने वाढविली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विवेक गोगटे यांनी दिली.

निवडणुकीत अध्यक्षांसह सहा पदाधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत. सत्ताधारी एकता पॅनलने ३१ जागांसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यात अध्यक्ष पदासाठी ललित बुब, उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पानसरे, जनरल सेक्रेटरी पदासाठी प्रमोद वाघ, खजिनदार पदासाठी गोविंद झा, सचिव पदासाठी हर्षद बेळे व योगिता आहेर हे सहा पदाधिकारी बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणुकीत कार्यकारिणी सदस्यांच्या २५ जागांसाठी २७ अर्ज दाखल झाले आहेत. यात सत्ताधारी एकता पॅनलने २५ उमेदवारांचे अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या निवडणुकीत विरोधी गटाने माघार घेतली होती, तर अजूनही आमले यांचा अर्ज कायम आहे. अर्ज माघारीची मुदत बुधवार (दि. 24) पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विवेक गोगटे यांनी दिली.

शरद दातीर यांनी सामजंस्य दाखवून अर्ज माघार घेतला आहे. त्याचप्रमाणे आमले यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी चर्चा करावी.
-धनंजय बेळे, माजी अध्यक्ष आयमा (Ambad Industries & Manufactures Association).

आयमामध्ये काम करण्याची इच्छा आहे. अर्ज माघार घेणार नाही. एका जागेसाठी निवडणूक घ्यायची किंवा नाही याचा विचार त्यांनी करावा. -अनिल आमले

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी एकता पॅनलने आमले यांच्याशी चर्चा करावी. चर्चा अयशस्वी झाली, तर कार्यकारिणी सदस्यांमधून एकाचा अर्ज माघारी घ्यावा व त्या ठिकाणी आमले यांना सामावून घ्यावे. तसेच अर्ज माघार घेतलेल्या उमेदवाराला निमंत्रित सदस्यांमध्ये सामावून घेतल्यास निवडणूक बिनविरोध होइल. -तुषार चव्हाण, विरोधी गट

हेही वाचा:

Back to top button