हुथी बंडखोरांची युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र अमेरिकेकडून उद्‍ध्‍वस्‍त | पुढारी

हुथी बंडखोरांची युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र अमेरिकेकडून उद्‍ध्‍वस्‍त

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेच्‍या लष्‍कराने आज (दि.२४) येमेनमधील हुथी बंडखोरांना पुन्‍हा एकदा दणका दिला. अमेरिकेने लाल सुमद्रात हुथींची दोन युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र (अँटी-शिप मिसाईल) उद्‍ध्‍वस्‍त केल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे. (US military destroying two Houthi anti-ship missile sat the Red Sea )

इस्रायल-हमास संघर्षात हुथी बंडखोरांनी मागील महिन्‍यात उडी घेतली. इस्‍त्रायल गाझा शहरावरील हल्‍ले बंद करेपर्यंत लाल समुद्रातील इस्‍त्रायलच्‍य मित्र देशांच्‍या व्‍यापारी जहाजांवर हल्‍ले केले जातील, अशी धमकी हुथी बंडखाेरांनी दिली होती. यानंतर व्‍यापारी जहाजांवर हल्‍ले सुरु झाले. अखेर अमेरिकेने यामध्‍ये हस्‍तक्षेप केला. ११ जानेवारीला अमेरिकेने येमेनमधील हुथींच्‍या ठिकाणांवर हल्‍ला सुरु केले. बुधवारी अमेरिकेने हुथी नियंत्रित भागातील जहाजांवर हल्‍ला करण्‍यासाठी तैनात केलेली दोन युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्र उद्‍ध्‍वस्‍त केल्‍याचे अमेरिकेच्‍या लष्‍कराने आपल्‍या निवदेनात म्‍हटले आहे. (US military destroying two Houthi anti-ship missile sat the Red Sea )

११ जानेवारीपासून अमेरिकेने हुथी बंडखोरांविरोधात कारवाई सुरु केली आहे. हुथी बंडखोरांनी १८ जानेवारी रोजी आणखी एका व्‍यापारी जहाजावर हल्‍ला केला. यानंतर अमेरिकेने आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत २५ हून अधिक युद्धनौकाभेदी प्रक्षेपण आणि 20 हून अधिक क्षेपणास्त्रे नष्ट केल्‍याचे अमेरिकेच्‍या लष्‍कराने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button