जळगाव : थर्डीफस्टला एमडीचे सेवन करणाऱ्या एकावर कारवाई | पुढारी

जळगाव : थर्डीफस्टला एमडीचे सेवन करणाऱ्या एकावर कारवाई

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जागोजागी तरुणाईसह सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नवीन वर्षाचे स्वागत होत असतानाच शाहू कॉम्प्लेक्स परिसरात रस्त्यावर शहर पोलिसांनी 31 डिसेंबर रोजी एमडीचे सेवन करणाऱ्या एकाला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून तीन हजार रुपये किमतीचे एमडी आमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई उत्साहात होती. जागोजागी तरुणांनी या स्वागतासाठी विविध प्रकारचे प्रयोजन केले होते. यात पोलीस यंत्रणा कोणतीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून जागोजागी बंदोबस्त-नाकाबंदी करीत होती. अशातच 31 डिसेंबर रोजी शहरातील शाहू नगरातील शाहू कॉम्प्लेक्स परिसरात एक तरुण हा एमडी या अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्या पथकाने  सायंकाळी ७.३० वाजता छापा टाकून संशयित आरोपी शाहरुख शिराज भिस्ती (28) राहणार शाहूनगर जळगाव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम एम डी अंमली पदार्थ आढळून आले.  दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी  विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button