Surat-Chennai Greenfield : आता शेवटचा पर्याय तुम्हीच, बाधित शेतकऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट | पुढारी

Surat-Chennai Greenfield : आता शेवटचा पर्याय तुम्हीच, बाधित शेतकऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

नाशिकरोड ; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गाच्या बांधकामामुळे त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. (Surat-Chennai Greenfield)

शेतकऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने त्यांना अत्यल्प मोबदला दिला आहे. द्राक्ष व इतर फळबागांसाठी रोपटे संभोदून तुटपुंजा भाव दिला जातो आहे. तसेच, महामार्गावर साईडरोड, पावसाचे पाणी जाण्यासाठी ड्रेनेज, पाईपलाईन क्रॉसिंग अशी कोणतीही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.

शेतकऱ्यांनी पवारांना सांगितले की, त्यांना योग्य मोबदला दिला तरच ते महामार्गाच्या बांधकामासाठी सहकार्य करतील. अन्यथा, एक इंच जमीनही शासनाला देणार नाहीत. पवारांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, ते या समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन प्रयत्न करतील.

शेवटचा पर्याय तुम्हीच

बाजार भाव किंव्हा रेडी रेकनेर यापैकी जो जास्त भाव असेल त्याप्रमाणे मोबदला द्यावा. ९९६ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. आमदार, खासदार, मंत्री सगळ्यांनाच भेटलो. मोर्चा काढला, निवेदने दिली पण उपयोग झाला नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आहोत, आता तुम्हीच काय ते करा, अशी भावनिक साद शेतकऱ्यांनी शरद पवार यांना घातली. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊ, समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

हेही वाचा :

Back to top button