नाशिकच्या मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय, आयबी व एटीएसकडून संशयित ताब्यात | पुढारी

नाशिकच्या मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय, आयबी व एटीएसकडून संशयित ताब्यात

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिकच्या मनमाड येथे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली आहे. आईबी व एटीएस यांनी ही कारवाई केली आहे. मनमाड मध्ये गणेश मंडळाचे चित्रीकरण केल्याचा संशय होता चित्रीकरण करून ट्रेनने जात असताना नगरसुल येथे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान चौकशी करून संशयितास सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. आज पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

संबधित बातमी :

महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपती बाप्पा अनेक घराघरात मंडळात विराजमान झाले असून  पहिल्याच दिवशी नाशिकच्या मनमाडमध्ये घातपाताचा कट उधळून लावला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरो व एटीएसने अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने एकाला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली.

मनमाडमध्ये गणेश मंडळाचे चित्रकरण करुन रेकी केल्याचा त्याच्यावर संशय असून मंडळाचे चित्रीकरण करुन संशयित अजिंठा एक्सप्रेसने जात असताना नगरसूल स्थानकातून रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. एटीएसने पहाटेपर्यंत संशयिताची कसून चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आले आहे.

ऐन गणेश उत्सवाच्या काळात गणेश मंडळाचे चित्रीकरण करणाऱ्या संशयिताला यंत्रणाच्या सतर्कतेमुळे ट्रेन मधून ताब्यात घेण्यात आल्याने संभाव्य मोठा घातपाताचा कट उधळून लावण्यात आला आहे. मात्र या संशयित व्यक्ती बाबत अध्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा :

Back to top button