नोकरी 15 मिनिटे ड्रायव्हिंग साडेपाच तास!

नोकरी 15 मिनिटे ड्रायव्हिंग साडेपाच तास!

कॉर्नवल : नोकरदारांना कार्यालयात पोहोचण्यासाठी कितीवेळ प्रवास करावा लागतो, यावर बरेच काही अवलंबून असते. वेळेत पोहोचण्यासाठी त्या अनुषंगाने वेळेत निघणे, यात महत्त्वाचे ठरते. आता रोज कार्यालयात पोहोचण्यासाठी काहींना अगदी दोन-दोन तास प्रवासही करावा लागतो. पण रोज एखादी व्यक्ती थोडीथोडकी नव्हे, तर साडेपाच तास प्रवास रोज करत असेल तर ते थोडे अतिच ठरावे. कॉर्नवलमधील अशीच एक व्यक्ती केवळ पाच मिनिटांच्या नोकरीसाठी 300 मैल अर्थात 482 किलोमीटर्सचा प्रवास करते, ही वस्तुस्थिती मात्र अर्थातच थक्क करणारी आहे.

'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रशालेत मुलांना सोडण्यासाठी ज्या ड्रायव्हरला नियुक्त केले गेले आहे, तो आसपास नव्हेतर चक्क 482 किलोमीटर ड्रायव्हिंग करून पोहोचतो. मुलांची प्रशाला केवळ 4 मैल म्हणजे 6 किलोमीटर अंतरावर आहे. अशा वेळी तेथे पोहोचण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटांचा वेळ पुरेसा ठरतो.

आता जो ड्रायव्हर आपल्या मुलांना शाळेत पोहोचवतो, परत आणतो, तो इसेक्समधून कॉर्नवलला येतो, याची त्या मुलांच्या पालकांनाही कल्पना नव्हती. पण याबद्दल कळाले, त्यावेळी तेही थक्क झाले. या मुलांची प्रशाला कॉर्नवलच्या लॉन्सेस्टन येथे आहे. सध्या ही तात्पुरती व्यवस्था असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. तरी ड्रायव्हर उपलब्ध होत नाहीत, यामुळेच इतकी दमछाक करावी लागते, ही वस्तुस्थिती असल्याचे यानिमित्ताने निदर्शनास आले आहे.

एक वर्षभरापूर्वीही ज्या ड्रायव्हरशी करार केला गेला, तो देखील 177 किलोमीटर्सवरून येत असे. त्याला अडीच तासांचा प्रवास करावा लागत असे. आता मात्र करार बदलल्यानंतर ड्रायव्हरही बदलला आणि केवळ तीन मुलांची शाळेतून ने-आण करण्यासाठी तो चक्क 477 किलोमीटर्सचा प्रवास रोज करतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news